मुंबईत २ पॅलेस्टाईन समर्थकांना अटक !

इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या २ पॅलेस्टाईन समर्थकांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रुचिर लाड आणि सुप्रीत रविश अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विनाअनुमती आंदोलन करणे, सरकारी आदेशाची अवज्ञा करणे असे आरोप आहेत.

ऐन नवरात्रोत्सवात सांडपाणी आणि अन्य दूषित पाणी पंचगंगेत 

कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला.

श्री दुर्गामाता दौडमध्ये अनुचित प्रकार घडल्यास गुन्हे नोंद करणार ! – पोलीस उपअधीक्षक

वाई शहरात नवरात्रोत्सव आनंदाने साजरा केला जातो. दुर्गोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी.

पुणे येथील ‘ज्यू’ धर्मियांच्या प्रार्थनास्थळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त !

‘इस्त्रायल’ आणि ‘हमास’ या आतंकवादी संघटनेमध्ये चालू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी शहरातील ‘ज्यू’ धर्मियांच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

जगातील कोणतीही महिला ही माझी माता आहे, ही श्रद्धा हिंदु धर्मातील प्राणभूत तत्त्व आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

संत तुकाराम महाराज यांनी ३ सहस्र ८७२ अभंग लिहिले असून सगळे उत्स्फूर्त आहेत. त्यातील एका अभंगात संत तुकोबाराय म्हणतात ‘पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें ॥’ याचा अर्थ परस्त्री ही माता रुक्मिणीसमान आहे, असे ते सांगतात.

काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांना सनातन पंचांग भेट !

उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांना ‘सनातन पंचांग २०२४’ भेट देण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. व सौ. मुंबारकर उपस्थित होते.

नवरात्रीच्या काळात सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येत आहेत ‘दशमहाविद्या याग’ !

सनातन संस्थेच्या आश्रमात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या दिवसांमध्ये ‘दशमहाविद्या यज्ञ’ करण्यात येत आहेत. १५ ऑक्टोबर या दिवशी ‘कालीयाग’ आणि १६ ऑक्टोबरला ‘तारायाग’ पार पडला.

किती शासकीय भूमी खासगी विकासकांना दिल्या ? याचा आढावा घ्यावा ! – मीरा बोरवणकर

खासगी विकासकांचा शासकीय भूमीवर डोळा असतोच. मी विरोध केला नसता, तर पुणे आयुक्त कार्यालयाची ३ एकर जागा खासगी विकासकाला दिली गेली असती.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या २ अधिकारी निलंबित आणि त्यांना अटक !  

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे २ अधिकारी उत्तरदायी असल्याचे निदर्शनास आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गणोरकर असे या निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची द्वितीयेला श्री महागौरीच्या रूपातील पूजा !

महागौरी ही गौरवर्णाची आहे. अष्टवर्षा भवेद गौरी म्हणजे ती ८ वर्षांची आहे. वस्त्रालंकार श्वेतवर्णाचे असून देवी चतुर्भुज आहे. तिचे वाहन वृषभ आहे.