छत्रपती संभाजीनगर येथे ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ या पुस्तकाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !

छत्रपती संभाजीनगर – ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक लेखक डॉ. अमित थढानी यांनी १० सहस्र पानांच्या आरोपपत्राचा अभ्यास करून सिद्ध केले आहे. या सर्व प्रकरणात न्यायालयात योग्य तो न्याय होईलच, याची निश्चिती वाटते. या पुस्तकाच्या माध्यमातून विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ येथे झालेल्या डॉ. अमित थढानी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. डॉ. अमित थढानी यांनी पुरोगाम्यांच्या हत्यांच्या तपासाविषयी लिहिलेल्या ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर मराठी भाषेतील हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड, पुस्तकाचे लेखक तथा मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. अमित थढानी, ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्री. कमलेश कटारिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
खर्या आरोपींना कुणी शोधलेलेच नाही ! – डॉ. थढानी

या प्रसंगी पुस्तकाचे लेखक डॉ. थढानी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होते. असे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉ. पानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते ? हे सर्व षड्यंत्र आहे. खर्या आरोपींना कुणी शोधलेलेच नाही. केवळ एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला गोवण्याचे काम केले आहे.
हे पुस्तक म्हणजे एका सर्जनने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे हा दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करतो. १६ फेब्रुवारी २०१५ ला सकाळी पानसरे यांची हत्या झाली. त्या वेळी सचिन अंदुरे सकाळी कोल्हापुरात होता; पण तो ज्या दुकानात काम करतो, तेथील रजिस्टरमध्ये तो अर्धा दिवस दुकानात नव्हता, अशी नोंद आहे. याचा अर्थ सचिन अंदुरे संभाजीनगरवरून कोल्हापूरला गेला. तेथे त्याने पानसरेंची हत्या केली आणि पुन्हा तो दुपारपर्यंत संभाजीनगरला परत आला, हे कसे शक्य आहे ? प्रत्यक्षात जायला-यायला किती वेळ लागेल ? या सर्वांची उत्तरे पोलिसांना द्यायची नाहीत. हे पुस्तक म्हणजे एका सर्जनने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे.
या वेळी ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्री. कमलेश कटारिया म्हणाले की, आज देशातील विविध न्यायालयांत ५ कोटी खटले प्रलंबित आहेत. अनेक खटल्यांतील हिंदुत्वनिष्ठ न्यायाची वाट बघत आहेत; मात्र दुर्दैवाने आज निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठांना छळले जात आहे.
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न