श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही. ज्याने स्वत:ला वारशापासून दूर ठेवले, त्याचे अध:पतन झाले, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. योगी ‘सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया’ ने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सिंधी अधिवेशनाला संबोधित करतांना त्यांनी हे वक्व्य केले. ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर आपण परत घेऊ शकतो, तर आपण पाकिस्तानातील सिंध परत घेऊ शकत नाही, असे म्हणण्याचे काही कारण नाही.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, केवळ एका व्यक्तीच्या हट्टामुळे देशाला फाळणीच्या दुर्घटनेतून जावे लागले. देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांची हत्या झाली. भारताचा मोठा भूभाग पाकिस्तानच्या रूपात निघून गेला. सिंधी समाजाला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. सिंधी समाजाने आजच्या पिढीला त्यांचा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे.