निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.

मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्‍या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड

मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

भारतातील दक्षिण कोरियाच्या दूतावासाने घेतलेल्या नव्या वाहनाची हिंदु पद्धतीने विधीवत् पूजा

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे. अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ?

सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार

‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.

यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण (सिंधुदुर्ग) किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी

यांत्रिक नौका, परप्रांतीय नौकाधारक आणि पारंपरिक मासेमार यांच्यात प्रतिवर्षी मासेमारीवरून वाद होत असतात. प्रतिवर्षीचा हा अनुभव असतांना मत्स्य विभागाचे प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना का काढत नाही ?

प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्‍यांचे कुंभारांशी साटेलोटे ?

नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.

दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात पुन्हा विक्रीस ठेवल्या जात असल्याने मूर्तीदान घेणार्‍या संस्थांवर महापालिकेने लक्ष ठेवावे ! – संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक

शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात किंवा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशमूर्तीतील गणेशतत्त्वे पाण्याद्वारे सर्वदूर पसरून चराचर सृष्टीला त्याचा लाभ होतो.

ठाणे येथे विसर्जन मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणेवर मुसलमानांचा आक्षेप !

हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?