मालवण – पावसाळ्याच्या कालावधीतील बंदी उठल्यानंतर १ सप्टेंबरपासून नवीन मत्स्य हंगाम चालू झाला आहे. असे असतांनाच येथील पारंपरिक मासेमारांना भेडसावणारी यांत्रिक नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात केली जाणारी मासेमारीची समस्याही निर्माण होऊ लागली आहे.
मत्स्य हंगामाच्या प्रारंभी समुद्रात मोठ्या प्रमाणात मासे मिळू लागल्याने २४ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात यांत्रिक नौकांनी घुसखोरी करून मासेमारी केली; मात्र त्यांना रोखण्यासाठी अद्यापही शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे पारंपरिक मासेमारांची मोठी हानी होऊ लागली आहे. शासनाने तातडीने यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करणार्यांवर नियंत्रण न आणल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी पारंपरिक मासेमारांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकायांत्रिक नौका, परप्रांतीय नौकाधारक आणि पारंपरिक मासेमार यांच्यात प्रतिवर्षी मासेमारीवरून वाद होत असतात. प्रतिवर्षीचा हा अनुभव असतांना मत्स्य विभागाचे प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना का काढत नाही ? |