भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !

आम्ही चीनच्या जहाजाला बंदरावर थांबण्याची अनुमती दिलेली नाही !

चीनचे जहाज हेरगिरी करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या बंदरावर येणार असल्याने भारताने अनुमती देण्यास विरोध केला होता.

अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या नावांची पाटी मराठीत लावणे अनिवार्य !

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तिथे व्यवसाय करतांना तुम्हाला तो मान्य करायला काय हरकत आहे ?-सर्वोच्च न्यायालय

‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी  येणार !

कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.

भारतावर आम्हला गर्व असून तो कधीही वाईट कृत्य करणार नाही ! – ए.के. अब्दुल मोमेन, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे  कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत.

ब्रिटनने १२ खलिस्तानी आतंकवाद्यांना केली अटक, ४० जणांचे व्हिसा रहित !

भारताच्या परराष्ट्रनीतीचाच हा विजय आहे. भारताने अशाच प्रकारे आक्रमक धोरण राबवून खलिस्तान्यांना आश्रय देणार्‍या देशांवर दबाव आणल्यास खलिस्तानांवर वचक बसवणे भारताला शक्य होईल !

कॅनडामध्ये भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान्यांची निदर्शने

कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.

केंद्रशासन शहरातील घरांसाठीच्या गृहकर्जावर अनुदान देणारी योजना आणणार

केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांकडून बेंगळुरू बंदचे आंदोलन

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांनी २६ सप्टेंबर या दिवशी बंद पाळला. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूला कावेरी नदीतून १५ दिवसांसाठी ५ सहस्र क्युसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.