गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

मानसिक आरोग्य सुदृढ करण्याच्या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद !

गोवा सरकारची ‘टेलीमानस गोवा’ योजना

पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्राच्या ‘टेली मेंटल हेल्थ’ योजनेच्या अंतर्गत गोवा सरकार ‘टेलीमानस गोवा’ ही योजना राबवत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये या योजनेला प्रारंभ केल्यानंतर आतापर्यंत १ सहस्र लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या अंतर्गत विनामूल्य ‘हेल्पलाईन’ सुविधा, मानसिक आरोग्यासंबंधी तज्ञांशी ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून सल्ला घेणे, ‘ई-प्रिस्क्रिपशन’, पाठपुरावा घेणे आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून समुपदेशन सेवा उपलब्ध केली जात आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, ‘‘टेलीमानस’ योजनेला लाभलेल्या प्रतिसादावरून या योजनेचे महत्त्वही लक्षात येते. अशा प्रकारे आरोग्य सुविधा पुरवणारे गोवा हे एक आदर्श राज्य झाले आहे.’’

संपादकीय भूमिका

  • केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे.
  • अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ? याचा विचार करणे आवश्यक आहे.