म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकचे जलद गतीने प्रयत्न !
पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटक सरकारने कळसा प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि खुणा करण्याचे (मार्किंग) काम पूर्ण केल्यानंतर आता भंडुरा प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि खुणा करण्याचे काम पूर्ण केले आहे. कर्नाटक सरकार या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याची जीवनदायिनी म्हणून गणल्या गेलेल्या म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवण्याच्या सिद्धतेत आहे.
कर्नाटक सरकारने यापूर्वी कळसा प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि खुणा करण्याचे काम पूर्ण करून प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) केंद्रीय जल आयोगाला सुपुर्द केला होता आणि आयोगाने कर्नाटकला धरण बांधून कणकुंबी येथील कळसा नाला अन् चोर्ला येथील हलतरा नाला यांचे पाणी वळवण्यास मान्यता दिली आहे. आता अशाच प्रकारे भंडुरा प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि खुणा करण्याचे काम पूर्ण करून हा प्रकल्प जलद गतीने पुढे नेण्यासाठी कर्नाटक सरकार कृतीशील आहे. कर्नाटक सरकार धरण बांधून भंडुरा नाल्याचे २.१८ टी.एम्.सी. पाणी मलप्रभा नदीत वळवणार आहे. वर्ष २०१८ मध्ये म्हादई जलवाटप तंटा लवादाने कर्नाटकला कळसा-भंडुरा प्रकल्पाचे ३.९ टी.एम्.सी. पाणी हुबळी आणि धारवाड ही शहरे आणि आसपासची गावे येथील पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण्यासाठी वळवण्यास मान्यता दिली आहे; मात्र कर्नाटक लवादाने संमत केलेले पाणी कृषी उत्पादनांसाठी वळवणार असल्याची भीती गोवा सरकारकडून व्यक्त केली जात आहे.
K’taka completes markings for Bhandura project https://t.co/rZhAEJe6Hk
— TOI Goa (@TOIGoaNews) April 13, 2023
रिचर्ड डिसोझा यांची म्हादईप्रश्नी गोव्याच्या सल्लागारपदी नियुक्ती
गोवा सरकारने वन खात्याचे माजी मुख्य संरक्षक रिचर्ड डिसोझा यांची गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील म्हादई जलवाटप तंट्याप्रश्नी सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.
Richard D’Souza is advisor on Mhadei https://t.co/cRihbmIAxu
— TOI Goa (@TOIGoaNews) April 13, 2023
म्हादई जलवाटप तंट्यावरून म्हादई वनक्षेत्र, म्हादईतील वन्यजीव आणि वन यासंबंधी प्रश्न यांना अनुसरून गोव्याच्या जलस्रोत खात्याला सल्ला देण्याचे दायित्व रिचर्ड डिसोझा यांचे रहाणार आहे.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦