विशिष्ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

१ मासात १३ ठिकाणी चाचणी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ एकच ‘एफ्.आय.आर्.’ नोंद !

पोलिसांचे इ.डी.एम्.च्या आयोजकांशी साटेलोटे असल्याचे आणि राज्यात ध्वनीप्रदूषण होण्याला पोलीसही उत्तरदायी असल्याचे यातून स्पष्ट होते, असे म्हटल्यास चूक ते काय ?

गोवा राज्यात आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !

आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !

मडगाव येथे रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे तिकिटाचा काळाबाजार उघडकीस

रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याचे सर्वज्ञात असतांना असे प्रकार राज्यात न होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी नेहमीच सतर्क रहाणे जनतेला अपेक्षित आहे !

नवी मुंबई येथे ए.पी.एम्.सी. परिसरातील फेरीवाल्‍यांवर महापालिकेची धडक कारवाई !

पादचार्‍यांनी फेरीवाल्‍यांवर कारवाईचे स्‍वागत करत चालण्‍यासाठी ‘फेरीवालामुक्‍त’ पदपथ उपलब्‍ध करून दिल्‍याविषयी पालिकेचे आभार मानले आहेत.

व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

मोपा ते बाणावली अंतरासाठी ‘गोवा टॅक्सी ॲप’ने आकारलेला दर अधिसूचित दराप्रमाणेच ! – पर्यटनमंत्री खंवटे

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प चालू होऊन ३ दिवसच उलटल्याने अशा समस्या उद्भवू शकतात; मात्र यावर फेरविचार करून समस्या सोडवता येईल. अशी देयके सामाजिक माध्यमात फिरवल्याने यावर तोडगा निघू शकत नाही.

म्हादईवर विशेष चर्चेसाठी प्रस्ताव आल्यास विचार करणार ! – सभापती रमेश तवडकर

म्हादई हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या म्हादईवर विशेष चर्चा करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही.

गोवा : कळंगुट परिसरातील ‘डान्स बार’, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ व्यवसाय बंद करा !

स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील !