वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !

७ जानेवारी या दिवशी आपण ‘अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’ याविषयीची माहिती देत आहोत.

राष्‍ट्रीय महिला आयोगाचे दायित्‍व काय ?

उर्फी भर रस्‍त्‍यात करत असलेले शरिराचे नग्‍न प्रदर्शन हे लहान मुले आणि मुली यांच्‍या मनावरही घातक परिणाम करणारे आहे. अजाणत्‍या वयात नको त्‍या गोष्‍टी समोर आल्‍याने बालमनावर होणारा गंभीर परिणाम कोण आणि कसा घालवणार ? हे चिंताजनक आहे.

विधीमंडळाचे कामकाज करतांना ‘जनतेचे प्रतिनिधी आहोत’, अशी जाणीव हवी !

सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्‍याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्‍यक आहे.

‘कार्यकर्ते आणि साधक यांची व्‍यष्‍टी साधना चांगली असणे’ हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्‍याने व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्‍हा !

उत्तरदायी साधकांनी व्‍यष्‍टी साधनेच्‍या निकषाच्‍या आधारे साधकांची शिबिरात सहभागी होण्‍यासाठी निवड करावी !

पत्नी आणि आई-वडील यांना प्रेमाने आधार देणारे देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. रवींद्र साळोखे (वय ४० वर्षे) !

२६.१२.२०१५ या दिवशी श्री. रवींद्र साळोखे यांच्‍याशी माझा विवाह झाला. आमच्‍या विवाहाला आठ वर्षे होत आली आहेत. या कालावधीत मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

व्‍यष्‍टी आढावा घेतांना ‘साधकांना कसे समजून घ्‍यायचे ?’, हे कृतीतून दाखवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

आज ९.१.२०२३ (पौष कृष्‍ण द्वितीया ) या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे मला म्‍हणाले, ‘‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍यासाठी प्रथम आपली दृष्‍टी तशी बनवणे आवश्‍यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्‍यादी.

रुग्‍णांप्रती संवेदनशील असणारी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी वैद्या (कु.) मोनिका कल्‍याणकर !

जानेवारी २०२३ पासून वैद्या (कु.) मोनिका कल्‍याणकर देवद आश्रमात सेवा करण्‍यासाठी गेल्‍या आहेत. त्‍या निमित्ताने त्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

गुरुदेवा, तोचि अधिकारी कृतज्ञतेचा ।

१६.६.२०२२ या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘शरणागती’ या सूत्रावरून घेतलेला एक भावप्रयोग ऐकल्‍यावर माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. त्‍यानंतर मला पुढील पद्यपंक्‍ती सुचल्‍या.

गुरुमाऊली, ध्‍यास लागो या जिवा केवळ तुझ्‍या चरणांचा ।

२३.५.२०२१ या दिवशी माझ्‍या मनाची स्‍थिती अस्‍थिर होती. त्‍या वेळी ध्‍यानमंदिरात गुरुदेवांशी आत्‍मनिवेदन करत असतांना त्‍यांनी सुचवलेली कविता त्‍यांच्‍याच चरणकमली अर्पण करते.