विशिष्ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची सरकारकडे मागणी

सौजन्य :साम

मुंबई – लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा. हिंदु मुली, महिला आणि भगिनी यांच्यावर एका विशिष्ट वर्गाकडून प्रतिदिन अन्याय अन् अत्याचार होत आहेत.

त्यांना हिंदु मुली या खेळाचे साधन वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच करावा, असेही त्यांना वाटत आहे कि काय ?, असा प्रश्‍न भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला.