माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

मदर तेरेसा यांनी कॅथॉलिक चर्चच्या वाईट गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम केले ! – माहितीपटातून आरोप

मदर तेरेसा यांच्यावर अशा प्रकारचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यांचा शोध घेऊन सत्य जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने एखादी समिती स्थापन करावी !

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

पाकमधून आलेले ड्रोन सैनिकांनी पाडले !

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन (चालकविरहित लहान विमान) गोळीबार करून पाडले. या ड्रोनमध्ये ९ पाकिटे होती.

कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’

महाराष्ट्रात ७ वर्षांपासून गोवंश हत्याबंदी असूनही गाय-बैल यांची संख्या १५ लाखांनी घटली !

गोवंश हत्याबंदी कायदा करूनही पोलिसांनी त्याची कठोर कार्यवाही न केल्याने गोवंशियांची सर्रासपणे हत्या केली जाते. यामध्ये एका विशिष्ट समाजाचा लक्षणीय सहभाग असूनही पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीत. अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !

मी स्वत: हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा पाठपुरावा करीन ! – डॉ. अर्चना पाटील, अपर तहसीलदार, सांगली

शाळांमधून बायबल शिकवत असतील, तर ती चुकीची गोष्ट असून मी स्वत: या निवेदनाचा पाठपुरावा करीन, असे आश्वासन सांगली येथील अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिले.