कर्नाटकात मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू

कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारे प्रा. रतन लाल यांना अटक आणि सुटका

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अन्य कुणाला अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही !

(म्हणे) ‘भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत असून ठिणगी टाकल्यावर देश जळायला लागेल !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू पंतप्रधान असतांना चीनने भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी गिळंकृत केली आणि काँग्रेसने कधीही ती चीनकडून परत मिळवली नाही, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?

औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा ! – भाजपचे नेते आफताब आडवाणी

आज जे काही होत आहे, ते सर्व औरंगजेबामुळे होत आहे. औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली आणि लुटमार केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्यात आले पाहिजे

रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग बंद झाल्याने सहस्रो यात्रेकरू अडकले

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी यांमधील रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग २० मेच्या सायंकाळपासून मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला.

बिहारमध्ये वादळी पावसामुळे ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये २० मे या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यांसह पाऊस पडला. काही घंटे पडलेल्या या पावसामुळे राज्यात मोठी हानी झाली. १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला.

लक्षद्वीप येथील समुद्रात २ नौकांमधून सापडले १ सहस्र ५२६ कोटी रुपयांचे हेरॉईन !

हे हेरॉईन कुठून आणण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !

मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची मागणी केली पाहिजे जी मूळची हिंदूंची आहेत !