चंद्रावरील मातीत रोप उगवण्यात वैज्ञानिकांना यश !

अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातील एना-लिसा पॉल आणि प्रा. रॉबर्ट फर्ल यांनी हे संशोधन केले असून त्यांना चंद्राची केवळ १२ ग्रॅम माती मिळाली होती. त्यांनी ११ वर्षे संशोधन करून चंद्राच्या मातीत रोप उगवले.

केंद्र सरकार राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटना सहजतेने का घेत आहे ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

सरकारने राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटनांना सहजतेने घेऊ नये. जर सरकार घाबरट असेल आणि अशा घटनांना काहीही प्रत्युत्तर देत नसेल, तर हिंदुत्वाविषयी बोलण्याचा लाभ काय ?

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशीद हटवण्याच्या मागणीवर १९ मे या दिवशी येणार निकाल !

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला अटक !

तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते बाँब बनवण्यापासून हत्या करण्यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे वेळोवळी सिद्ध झाले आहे. अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !

पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाकडे पाठवतो ! – भाजपचे आमदार नितेश राणे

खासदार संजय राऊत यांची ओवैसी यांना चेतावणी “तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल !”

ज्ञानवापीच्या प्रकरणी आदेश देणार्‍या न्यायाधिशांना कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता

यावरून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !

आजपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण होणार

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले , उद्या होणार्‍या सर्वेक्षणापूर्वी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

परिणाम भोगायला सिद्ध राहा !

फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे.

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी

‘ब्राह्मोस’च्या साहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, अण्वस्त्र ठेवण्यात आलेले बंकर, आदेश आणि नियंत्रण केंद्र, समुद्रातील विमानवाहू नौका यांवर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास साहाय्य होणार आहे. यानंतर ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे.