बांगलादेशी नागरिकांशी संबंधित प्रकरणात उत्तरप्रदेशच्या देवबंदमध्ये ‘एन्.आय.ए.’ची पुन्हा धाड !

‘एन्.आय.ए.’च्या पथकाने बनावट पासपोर्ट आणि बनावट आधारकार्ड बनवल्याच्या प्रकरणी दारुल उलुम वक्फ भागातून मुस्तकीम याला कह्यात घेतले.

अमेरिकेकडून फिनलंड आणि स्वीडन यांना ‘नाटो’चे सदस्य बनण्याचे निमंत्रण

युक्रेन-रशिया युद्ध चालू असतांनाच ‘नाटो’ ने फिनलंड आणि स्वीडन  यांना ‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनण्याचे निमंत्रण दिले आहे.

बेंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन  

केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.

श्रीलंकेतील प्रांतीय निवडणुका होण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा !

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या एका समुहाने भारताकडे आग्रह धरला आहे की, त्याने श्रीलंकेतील ९ प्रांतांमधील प्रलंबित निवडणुका होण्यासाठी हस्तक्षेप करावा.

पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी

असा खोडसाळपणा करणार्‍या संबंधिताला कह्यात घेऊन त्याला कठोर शिक्षा केल्यासच पुन्हा असे करण्यास कुणी धजावणार नाही !

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय दुग्धशाळा विक्रीला काढल्या !

सरकारी योजना डबघाईला आणून स्वतःचे खासगी व्यवसाय भरभराटीला आणणे, हा स्वार्थी राजकारण्यांचा जनताद्रोहच ! या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे !

आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेतला ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गट

आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणीही येथे मंत्रीपदाच्या आशेने आलेले नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

‘‘संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’

पाकवर दबाव आणण्यासाठी चीनचे माजी परराष्ट्रमंत्री पाकच्या दौर्‍यावर !

चीनच्या मागणीला पाकच्या गृहमंत्रालयाने तीव्र विरोध दर्शवल्याने यावर मार्ग काढण्यासाठी यांग जिइची हे पाकमध्ये आले आहेत.

कन्हैयालाल यांच्याप्रमाणे नूपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने नितीन जैन यांच्याही हत्येचा कट

हिंदूंना वेचून ठार मारण्याच्या जिहाद्यांना आता मुळासह नष्ट करण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !