महाराष्ट्रात ७ वर्षांपासून गोवंश हत्याबंदी असूनही गाय-बैल यांची संख्या १५ लाखांनी घटली !

पशूगणनेतील आकडेवारीतील माहिती

संभाजीनगर – गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या अल्प होऊ नये; म्हणून महाराष्ट्रात ४ मार्च २०१५ पासून ‘गोवंश हत्याबंदी कायदा’ आणण्यात आला; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोवंशियांची संख्या वाढण्याऐवजी अल्पच झाली आहे. वर्ष २०१२ च्या पशूगणनेनुसार राज्यात १ कोटी ५४ लाख ८४ सहस्र २०७ गोवंशीय होते. वर्ष २०१९-२० च्या पशूगणनेत ही संख्या १ कोटी ३९ लाख ९२ सहस्र ३०४ इतकी झाली आहे. याचाच अर्थ या काळात १४ लाख ९१ सहस्र ९०३ गाय-बैल अल्प झाले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या गोवंशियांची हत्या होऊ नये; म्हणून अनेक वर्षांपासून त्यावर बंदी आणण्याची मागणी होती. २६ फेब्रुवारी २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा संमत करण्यात आला होता आणि ४ मार्च २०१५ पासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे; पण प्रत्यक्षात हा कायदा निष्प्रभ ठरल्याचे पशूगणनेतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हत्येवर बंदी नसलेल्या पशूंची संख्या वाढली आहे. वर्ष २०१२ मध्ये ५५ लाख ९४ सहस्र ३९२ म्हशी होत्या. वर्ष २०१९-२० मध्ये त्यांत ९ सहस्र ३०० ने वाढ होऊन म्हशींची संख्या ५६ लाख ३ सहस्र ६९२ झाली आहे. मेंढ्यांमध्येही ९९ सहस्र ९४८ ची वाढ झाली आहे. बकऱ्यांच्या संख्येत २१ लाख ६९ सहस्र ५७६ ने वाढ झाली आहे.

संपादकीय भूमिका 

  • गोवंश हत्याबंदी कायदा करूनही पोलिसांनी त्याची कठोर कार्यवाही न केल्याने गोवंशियांची सर्रासपणे हत्या केली जाते. यामध्ये एका विशिष्ट समाजाचा लक्षणीय सहभाग असूनही पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीत. अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !
  • विशिष्ट समाजातील लोकांनी गोरक्षकांवर आक्रमणे केल्यास पोलीस त्याकडेही कानाडोळा करतात. जोपर्यंत पोलिसांकडून गोहत्याऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत गोवंशियांची संख्या वाढणार नाही, हे लक्षात घेऊन सरकारने कृतीशील पावले उचलावीत !