उत्तरप्रदेशमध्ये ७ सहस्र ४४२ मदरशांची चौकशी होणार !
मदरशांच्या आधुनिकीकरणावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र त्याची फलनिष्पत्ती काय ? त्यात मदरशांना मिळणारे पैसे लाटले जात असल्याचेही पुढे येत आहे. हे सर्व प्रकार पहाता मदरशांना टाळे ठोका !
मदरशांच्या आधुनिकीकरणावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र त्याची फलनिष्पत्ती काय ? त्यात मदरशांना मिळणारे पैसे लाटले जात असल्याचेही पुढे येत आहे. हे सर्व प्रकार पहाता मदरशांना टाळे ठोका !
कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.
कोरोना महामारी, तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीविषयी असलेली संभ्रमाची स्थिती यांमुळे जर्मनीत रहाण्याचा खर्च वाढला आहे. मार्च २०२२ चा महागाई दर हा गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असू शकतो.
पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लंडन येथील कार्यालयावर पुन्हा आक्रमण झाले आहे. २ दिवसांपूर्वीही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्यावर आक्रमण झाले होते. आता १५ ते २० लोकांनी हे आक्रमण केल्याचे वृत्त आहे.
अमरोहा जिल्ह्यातील काकर सराय गावातील एका दफनभूमीत असलेल्या धर्मिक स्थळाला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये काही धार्मिक पुस्तके जाळण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ कधी बाँब सापडतात का ?
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारकडून अफूच्या शेतीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील अफूचा जगभरात पुरवठा होतो. या दिवसांत संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करण्यास आरंभ होतो. त्या पार्श्वभूमीवर तालिबानने वरील चेतावणी दिली आहे.
हिंदूंनी हलाल मांस खाऊ नये, ते समाजातील एका विशिष्ट लोकांसाठी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री शोभा करंदलाज यांनी येथे केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मुसलमानांनी हलाल मांस खाण्याविषयी आमचा आक्षेप नाही; परंतु ते हिंदूंना खाण्यासाठी बाध्य करणे योग्य नाही.
सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
बंगल्याच्या ३ लाख ५० सहस्र रुपयांच्या थकित वीजदेयकापोटी वीज खंडित करणार्या महावितरण अधिकार्याला भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केली होती. याचा १ ऑडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला होता.