Shahbaz Sharif On Kashmir : ‘काश्मीर ५ जानेवारी कधीही विसरू शकत नाही !’

  • पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळओक !

  • पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये सार्वमताचे सूत्र उपस्थित

पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद – ५ जानेवारी हा दिवस पाकिस्तानमध्ये ‘काश्मीरमधील लोकांसाठी निर्णय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर अनेक आरोप करत पुन्हा एकदा सार्वमताचे सूत्र उपस्थित केले. पाकिस्तान नेहमीच जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या सार्वमताच्या हक्काच्या बाजूने राहिला आहे. भविष्यातही आपण काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.

शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, काश्मीरमधील लोकांना ७ दशकांपासून सार्वमताच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात यावे, हे दुर्दैव आहे. संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांच्या आश्‍वासनांचे पालन केले पाहिजे, जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना सार्वमताचा अधिकाराचा वापर करता येईल.

५ जानेवारी १९४९ या दिवसाचा इतिहास

५ जानेवारी १९४९ या दिवशी संयुक्त राष्ट्रांनीजम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि निष्पक्ष सार्वमताची हमी देणारा ऐतिहासिक ठराव स्वीकारला होता. काश्मीर भारतसमेवत रहायला हवे कि ते पाकिस्तानला देण्यात यावे, याविषयीचा निर्णय लोकशाही पद्धतीने आणि निष्पक्षपातपणे जनमत घेऊन करण्यात यावा, असा संयुक्त राष्ट्रांनी निर्णय दिला होता.

संपादकीय भूमिका

जर पाकिस्तान काश्मीरमध्ये सार्वमताची मागणी करत असेल, तर भारतानेही पाकिस्तानपासून फुटण्याच्या मार्गावर असलेले बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सार्वमत घेण्याची मागणी लावून धरावी !