बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंनी हलाल मांस खाऊ नये, ते समाजातील एका विशिष्ट लोकांसाठी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री शोभा करंदलाज यांनी येथे केले.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मुसलमानांनी हलाल मांस खाण्याविषयी आमचा आक्षेप नाही; परंतु ते हिंदूंना खाण्यासाठी बाध्य करणे योग्य नाही. हलाल मांसासाठी लागणार्या प्रमाणपत्राच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी जनतेचे मत घेतले गेले पाहिजे.
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे बोलीं- हिंदू न खाएं हलाल मीट, यह समाज के एक वर्ग के लिए है – https://t.co/95ioHxUrIE
— Jansatta (@Jansatta) April 4, 2022
हिंदूवंर हलाल मांस थोपवणे चुकीचे ! – ग्रामीण विकास मंत्री के.एस्. ईश्वरप्पा
कर्नाटक सरकारमधील ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्वरप्पा म्हणाले, ‘‘हलाल ही संकल्पना काही लोकांनी, विशेषतः काही संघटनांनी निर्माण केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील लोकांना त्रास होत आहे. मुसलमानांना जर हलाल मांस खायचे असेल, तर त्यांनी ते खावे; परंतु हिंदूंवर ते थोपवणे चुकीचे आहे.
यापूर्वी भाजपचे नेते सी.टी. रवि यांच्यासह इतरही नेत्यांनी हिंदूंनी हलाल मांस न खाण्याविषयी विधान केले आहे.