Police Online Attendance At Mahakumbh : कुंभक्षेत्री नियुक्त असलेल्या पोलिसांची नोंदवली जात आहे ‘ऑनलाईन’ उपस्थिती !

प्रयागराज – उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या ‘डिजिटल कुंभ’ या संकल्पनेच्या अंतर्गत कुंभक्षेत्री नियुक्त असलेल्या पोलिसांची आता ऑनलाईन उपस्थिती नोंदवली जात आहे. यापूर्वी ती वहीत प्रत्यक्ष नोंदवली जात होती. महाकुंभपर्वाच्या बंदोबस्तासाठी नियुक्ती झालेल्या पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीच्या या ऑनलाईन पद्धतीचा लाभ प्रशिक्षणकार्याची माहिती गोळा करण्यासाठीही होत आहे.