Congress Announced Pyari Didi Scheme : देहलीत सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये देणार ! – काँग्रेसचे आश्‍वासन

नवी देहली- देहलीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आम आदमी पक्षाने पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेसनेही महिलांना प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये देणारी ‘प्यारी दीदी योजना’ घोषित केली आहे.

कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, मला पूर्ण विश्‍वास आहे की, काँग्रेस देहलीत सरकार स्थापन करेल आणि आम्ही महिलांना २ सहस्र ५०० रुपये देऊ. याचा निर्णय सरकारच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याचा बैठकीत घेऊ.

संपादकीय भूमिका

जनतेचे पैसे जनतेला देऊन मते घेण्याचा हा नवीन प्रघात संपूर्ण देशात चालू झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. ‘यातून आपल्याला गंडवले जात आहे’, हे जनतेच्या लक्षात येत नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे ! अशामुळे भारतीय लोकशाही सशक्त होण्याऐवजी राजकारण्यांकडून दुबळी केली जात आहे, हे जनतेच्या लक्षात येईल तो सुदिन !