Sambhal Masjid Survey : (म्हणे) ‘संभल मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करू नका !’

मुसलमान पक्षाची अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – संभल जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार शाही जामा मशीद व्यवस्था समिती तेथे चालू असलेली सर्वेक्षणाच्या संदर्भातील कारवाई थांबवण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात पोचली आहे. सर्वेक्षणावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका समितीने प्रविष्ट (दाखल) केली आहे. तसेच ‘आयुक्तांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करू नये’, ‘पुढील सुनावणीपर्यंत तेथे चालू असलेल्या कारवाईला स्थगिती द्यावी’, अशा मागण्या यात करण्यात आल्या आहेत. यावर ७ किंवा ८ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

संभल मशीद पूर्वीचे मंदिर होते, हे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले असल्यानेच मुसलमान पक्ष अशी मागणी करत आहे, हे लक्षात घ्या !