कायद्यानुसार मुलीचा पाठलाग करणे हा गुन्हा नाही !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निर्णय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका खटल्याची सुनावणी करतानां सांगितले की, कायद्यानुसार मुलीचा पाठलाग करणे, हा गुन्हा नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, जर कुणी मुलीची वारंवार छेड काढत असेल, तर तो त्याच्या वागणुकीच्या आधारे गुन्हा मानला जाऊ शकतो. या प्रकरणात न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या २ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. घटना वर्ष २०२० मध्ये घडली होती. तेव्हा मुलगी १४ वर्षांची होती, तर दोन्ही मुले १९ वर्षांची होती. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत मुलीचा पाठलाग केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला होता; पण वरील सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली.