विवाह ठरवून तो मोडणार्‍या वरासह कुटुंबियांवर गुन्हा नोंद ! 

छत्रपती संभाजीनगर – विवाहाचा दिनांक ठरल्यानंतर त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिकांचे वाटप केले; मात्र ऐनवेळी वराने विवाहास नकार दिला. त्यामुळे नकार देणार्‍या वरासह त्याच्या कुटुंबियांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हर्षवर्धन आसाराम भालेराव असे वराचे नाव आहे. या प्रकरणी २८ वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

दुसर्‍या घटनेत १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ७ तोळे सोने देण्याची मागणी करून विवाहास नकार देणार्‍या वरासह त्याच्या कुटुंबाच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार १० जून ते ८ ऑक्टोबर या कालावधीत सिल्कमिल कॉलनी परिसरात घडला. वर आकाश महेंद्र हजारे यांच्यासह कुटुंबियांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.