चिन्मय कृष्णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने हस्तक्षेप करावा ! 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागल (कोल्हापूर), तसेच निपाणी, संकेश्वर (कर्नाटक) येथील मूक आंदोलनात मागणी

निपाणी येथे मूक आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ डिसेंबर या दिवशी कागल (कोल्हापूर), तसेच निपाणी, संकेश्वर (कर्नाटक) येथे मूक आंदोलन आंदोलन करण्यात आले. यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली.

१. कागल येथे झालेल्या आंदोलनात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. विनायक आवळे, शिवसेनेचे श्री. धनाजी नागराळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रणित कुन्नुर, श्री. प्रणव निंबाळकर, श्री. संदीप आवळे, ‘बाबाय्या स्वामी शिवप्रतिष्ठान’चे श्री. दिलीप पाटील, श्री. अशोक माळी यांसह हिंदु जनजागृती समितीचे साधक उपस्थित होते.

कागल येथे मूक आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
संकेश्वर येथे मूक आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

२. निपाणी येथे बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, ‘श्रीराम सेना, कर्नाटक’चे श्री. बबन निर्मळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल बुडके आणि आप्पासाहेब जबडे सहभागी झाले होते. या आंदोलनात रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिकही सहभागी होते.

३. संकेश्वर येथे शिवसेनेचे श्री. सुभाष कातारकर, हिंदुत्वनिष्ठ ज्येष्ठ नेते श्री. जयप्रकाश सावंत, माजी नगरसेवक श्री. दीपक भिसे, श्रीराम सेनेचे श्री. शाम यादव, ‘पतंजली योग समिती’चे श्री. पुष्कराज माने आणि श्री. राजू इंडी, कराटे प्रशिक्षक श्री. बसवराज नागराळी, सुवर्ण व्यापारी श्री. रमेश माने, धर्मप्रेमी श्री. अमोल खोत सहभागी होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? सरकार स्वत:हून का कारवाई करत नाही ?