शाळेच्या दाखल्यामधील जन्मदिनांकानुसार वय ग्राह्य धरले पाहिजे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी वय दाखवण्यासाठी मतदान ओळखपत्र किंवा शिकाऊ वाहन परवाना योग्य नाही, असे म्हटले आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलावर बलात्काराचा आरोप आहे. मतदान ओळखपत्रानुसार तो अल्पवयीन नाही. त्याच्या अधिवक्त्याने शाळेचा दाखला सादर केला, त्यानुसार तो अल्पवयीन आहे. न्यायालयाने ‘शाळेच्या दाखल्यानुसार वय ग्राह्य धरले पाहिजे’, असे सांगितले.