सामूहिक महाआरतीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग !

रांजणी (पुणे) – येथील ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरात प्रत्येक शनिवारी सायंकाळी होणार्‍या श्री नरसिंह महाराजांच्या सामूहिक महाआरतीला महिला आणि ज्येष्ठ यांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याची नोंद शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने घेऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे. रांजणी ग्रामस्थांनी श्री नरसिंह महाराज मंदिरात सामूहिक महाआरती चालू केली. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ३ कोटी रुपये खर्च करून मंदिराची उभारणी केली. १ एप्रिल २०२३ पासून सामूहिक महाआरती चालू आहे. यासाठी भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.