|
कोलकाता (बंगाल) – बंगाल राज्यातील नदिया येथे एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या कुटुंबियांनी यासाठी तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य ब्रज गोपाल गोला यांच्या २१ वर्षीय मुलावर आरोप केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या प्रकरणावर शंका उपस्थित केली आहे. त्या म्हणाल्या की, या मुलीवर बलात्कार झाला होता, ती गरोदर होती का ? कि प्रेम प्रकरण होते ? कि ती आजारी होती, हे तुम्हाला कसे ठाऊक ? जर हे जोडपे प्रेमात होते, तर आम्ही त्यांना कसे रोखू ? हा उत्तरप्रदेश नाही की, मी ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली असे करीन. (अत्यंत असंवेदनशील असणार्या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे ! – संपादक)
बर्थ-डे पार्टी में TMC नेता के बेटे ने नाबालिग फ्रेंड से किया रेप, अगले दिन मौत, ये है पूरा केस#WestBengal | #TMC | #Crimehttps://t.co/8SBeStU7H6
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) April 11, 2022
१. ममता बॅनर्जी यांनी याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी पुढे म्हटले की, ही मुलगी ५ एप्रिल २०२२ या दिवशी मरण पावली आणि या घटनेविषयी पोलिसांना १० एप्रिलला कळवण्यात आले. ५ एप्रिलला तिचा मृत्यू झाला आणि तक्रार असेल, तर घटनेच्या दिवशी तिचे कुटुंबीय पोलिसांकडे का गेले नाहीत ? त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आता पोलिसांना पुरावे कुठून मिळणार ? याप्रकरणी बाल आयोग बलात्कार आणि हत्या यांची चौकशी करेल.
२. ‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी’, अशी विनंती मुलीच्या कुटुंबियांनी कोलकाता उच्च न्यायालयात केली आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला. ममता म्हणाल्या की, देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, आसाम आदी राज्यांत होणार्या हत्यांचे अन्वेषण सीबीआय करते का ? तुम्ही (भाजप) सीबीआय आणि ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) वापरून किती कट रचता, याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही दुर्बल आहोत, असे समजू नका !
३. कुटुंबियांनी सांगितले की, त्यांची मुलगी ९ वीत शिकत होती. ४ एप्रिलला ती वाढदिवसाच्या मेजवानीत सहभागी होण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती; परंतु ती जेव्हा घरी परतली, तेव्हा तिची अवस्था वाईट होती. मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. तिच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि आम्ही तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
४. या घटनेच्या ४ दिवसांनंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली. कुटुंबियांचा आरोप आहे की, तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली पोलिसांनी मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र न देता तिचे अंत्यसंस्कार केले.
५. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री निवडण्याच्या निर्णयाचा जनतेने फेरविचार केला पाहिजे. जर मुलीच्या कुटुंबाला सीबीआय चौकशी हवी असेल, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.