लंडन (ब्रिटन) – खलिस्तान समर्थक शीख विदेशात भारतविरोधी आंदोलन करत आहेत. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेकडून विविध देशांत ‘किल मोदी पॉलिटिक्स’ नावाने आंदोलन चालवले जात आहे. २८ डिसेंबर या दिवशी वॉशिंग्टन येथे अशा प्रकारचे आंदोलन झाले. त्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरही याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.
१. उच्चायुक्तालयाबाहेर जमलेल्या खलिस्तान समर्थकांनी खलिस्तान राष्ट्राची मागणी केली. ही मागणी करत असतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलनानंतर तेथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
२. खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाल्यानंतर खलिस्तान समर्थकांकडून विदेशात भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड, हिंदु मंदिरांची विटंबना असे अनेक प्रकार घडत आहेत.