‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या : ८ धर्मांधांना अटक
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस धर्मांधांकडून गेली अनेक वर्षे केले जात आहे. ‘स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनीही भारतात हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण का निर्माण केले गेले नाही ?’, याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी द्यायला हवे !
नेवासा (जिल्हा नगर) – नेवासा तालुक्यात १० एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीच्या निमित्ताने भगवान श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी २० ते २५ धर्मांधांनी एकत्र येऊन मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा दिल्या. त्यानंतर हिंदूंकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणार्या जिहाद्यांना बेदम चोप देण्यात आला. या वेळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून रेहान शेख, फजल शेख यांच्यासह ६ धर्मांधांना अटक करण्यात केली. त्यांना नेवासा न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोठ्या प्रमाणावर जमाव जमलेला असतांना, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असतांना पोलीस बंदोबस्त नव्हता. मिरवणूक चालू असतांना १ अधिकारी, १ पोलीस कर्मचारी मिरवणुकीत बंदोबस्त करत होते. ‘या ठिकाणी पोलिसांची अधिक कुमक असती, तर मिरवणूक शांततेत पार पडली असती’, असे नागरिकांनी म्हटले आहे. (ही पोलिसांची निष्क्रीयता नव्हे का ? – संपादक)