(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ?

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

जो खर्‍या अर्थाने या देशाच्या भूमीवर प्रेम करतो आणि तिला आपले मानतो, तो कधीही ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार नाही; मात्र जे विरोध करत आहेत, त्यांनी कितीही ते या भूमीवर प्रेम करत असल्याचे दाखवले, तरी ती ढोंगबाजीच आहे, हे लक्षात घ्या !

हिंदी महासागरातील चीनच्या युद्धनौकांवर नौदलाचे लक्ष ! – नौदलप्रमुख आर्. हरिकुमार

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यासमवेतच्या संघर्ष आणि तणाव यांच्या घटनांनंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क आहे. चीनच्या प्रत्येक नौकेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरिकुमार यांनी दिली.

समस्या सोडवण्यासाठी प्रथम मध्यस्थतेचा प्रयत्न केला पाहिजे ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

मध्यस्थतेच्या माध्यमांतून कोणतीही समस्या अल्प वेळेत सोडवली पाहिजे. न्यायालयात जाऊन त्यासाठी चकरा मारण्यास वेळ घालवण्यापासून वाचले पाहिजे.

गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदूंकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला पुन्हा विरोध

हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते थांबवत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाकमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला जिवंत जाळले !

भारतातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले श्रीलंकेच्या नागरिकाच्या बाजूने उभे रहाणार आहेत का ? ते धर्मांधांच्या कृत्याचा निषेध तरी करणार आहेत का ?

आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे.

वादळी वारा आणि प्रचंड पावसातही श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या सांगली येथील धारकर्‍यांकडून श्रीरायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीची पूजा !

१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्‍यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्‍यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर एकही मराठी शब्‍द न उच्‍चारता केले ‘प्रमुख पाहुणे’ म्‍हणून भाषण !

जावेद अख्‍तर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली; मात्र त्‍याच मराठीचा गौरव करण्‍यासाठीच्या संमेलनात त्‍यांनी मराठीचा असा उपमर्द का केला ?

नगर जिल्‍ह्यात आतापर्यंत ९०० कोटी रुपये महसूल जमा ! – राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची माहिती

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकांनी ऑक्‍टोंबर २०२१ पर्यंत अवैध आणि बनावट दारू तयार करणार्‍यांवर धाड घातली. यामध्‍ये ९६२ गुन्‍हे नोंद  करून ८३० आरोपींवर कारवाई केली.