(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

  • ‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ? – संपादक

  • प्राचीन संस्कृत भाषेत सर्वाधिक, तर इंग्रजी भाषेत अल्प शब्द आहेत. त्यामुळे आपल्या मूळ भाषेतील शब्द घेण्याऐवजी परकीय भाषेतील शब्द  घेणे, म्हणजे श्रीमंताने इतरांकडे हातपाय पसरण्यासारखे आहे ! – संपादक
  • हे विधान म्हणजे भाषावृद्धीसाठी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग मातृभाषेचे अस्तित्व मिटवण्यासाठी करण्याचा प्रकार नव्हे का ? – संपादक

  • प्रखर धर्माभिमानच भाषाभिमान निर्माण करतो. मराठी जनांना असे अयोग्य मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करणार्‍या अशा साहित्यिकांना मराठीप्रेमींनी वैध मार्गाने जाब विचारावा ! – संपादक 
डॉ. चंद्रकांत पाटील आणि श्री. दिलीप माजगांवकर श्री.रामदास भटकळ यांची मुलाखत घेतांना ( श्री.रामदास भटकळ मध्यभागी बसलेले)

नाशिक – आपण मराठीजनांनी भाषेविषयी व्यापक भूमिका घेतली नाही. ‘पॉप्युलर’ हा शब्द इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. अन्य भाषांतील शब्द आपल्या भाषेत घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही, असे वक्तव्य ‘पॉप्युलर’ पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक, तसेच व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी डॉ. चंद्रकांत पाटील आणि दिलीप माजगांवकर यांनी रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी भटकळ यांनी वरील विचार व्यक्त केले. (अन्य भाषांतील शब्दांमुळे मराठी भाषा कशी काय समृद्ध होईल ? छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मराठी भाषा समृद्ध व्हावी, यासाठी मराठी भाषाकोष सिद्ध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही परकीय भाषांसाठी मराठीतील शब्दांचे संशोधन केले. यातून भाषेची वृद्धी होण्यासाठी मराठीची समृद्धी होणे आवश्यक आहे ! – संपादक)

शालेय पुस्तकांच्या छपाईत भ्रष्टाचार चालतो ! – रामदास भटकळ

शालेय पुस्तकांच्या छपाईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे मी शालेय पुस्तकांच्या छपाईत कधी सहभाग घेतला नाही. ‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेत भ्रष्टाचाराला स्थान नाही. आमच्या कर्मचार्‍यांनाही तशी सूचना देण्यात आली आहे. आम्हीही भ्रष्टाचार करत नाही आणि ज्याचा भ्रष्टाचारावर विश्वास आहे, त्यांना आम्ही जवळ करत नाही. (सरकारी यंत्रणांमध्ये खोलवर पोचलेल्या भ्रष्टाचारामुळेच लोकशाही खिळखिळी झाली आहे. भौतिक शिक्षणात नैतिक मूल्यांना दुय्यम स्थान असल्यामुळे शिक्षित समाजही अधिक भ्रष्टाचार करत आहे. हे चित्र पालटण्यासाठी नैतिक मूल्ये आणि साधना यांवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्याय नाही ! – संपादक)