मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेविरुद्ध धर्मांतराविषयी गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती संस्था यांच्यावर गेली अनेक दशके हिंदूंचे धर्मांतर करण्याचे आरोप होऊनही आतापर्यंत हिंदूंना न्याय मिळलेला नाही. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने येथील हिंदूंना न्याय मिळेल, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

देहलीतील ‘अकबर रोड’ला जनरल बिपीन रावत यांचे नाव द्या ! – भाजपची देहली नगरपरिषदेकडे मागणी

अकबर हा आक्रमणकर्ता असतांना रस्त्याला आतापर्यंत त्याचे नाव असणे हिंदूंना लज्जास्पद !

भारतीय चलनी नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करा ! – कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

यावर सुनावणी करतांना न्यायालयाने केंद्र सरकारला याविषयीचे उत्तर देण्यास नोटीस बजावली आहे. यावर २१ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

सूरत (गुजरात) येथे ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’ आयोजित करणार्‍या उपाहारगृहावर  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आक्रमण

शत्रूराष्ट्राचा उदो उदो करणार्‍यांना ‘देशद्रोही’ घोषित करून सरकारने त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

गायींच्या रक्षणासाठी तलवारी आणि अन्य शस्त्रे खरेदी करा ! – विहिंपच्या नेत्या साध्वी सरस्वती

साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’, हे माझे दोन संकल्प आहेत.

गोहत्या बंदी कायदा आणि गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा !

अशी मागणी का करावी लागते ? आतापर्यंत सरकारनेच गोहत्या बंदी कायदा आणि गायीला राष्ट्रीय पशू घोषित करणे आवश्यक होते, असेच हिंदूंना वाटते !

महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ केल्यामुळे निलंबित केलेल्या भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला. या खटल्याची पुढील सुनावणी जानेवारी मासात होणार आहे.

श्रीनगर येथे आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पोलिसांकडे नव्हती शस्त्रे !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांचा धोका पहाता इतका हलगर्जीपणा कसा केला जातो ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

आज चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु एकता महाकुंभ’चे आयोजन

उद्या, १५ डिसेंबर या दिवशी ‘हिंदु एकता महाकुंभ’चे आयोजित करण्यात आले आहे. यात ५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील उद्यानांत महिला करतात नमाजपठण !

सार्वजनिक ठिकाणी हिंदूंनी धार्मिक कृती केली, तर पोलीस त्यांच्यावर अनुमती नसल्यावरून कारवाई करतात; मात्र अल्पसंख्यांकांनी असे काही केले, तर पोलीस आणि प्रशासन शेपूट घालतात !