पुणे येथे नानासाहेब पेशवे यांच्‍या जन्‍मत्रिशताब्‍दी सोहळ्‍यानिमित्त पेशवे यांची मूर्ती आणि पवित्र जलकलश पूजन !

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्‍मारक समितीच्‍या वतीने पेशवे यांचा जन्‍म त्रिशताब्‍दीचा मुख्‍य सोहळा त्‍यांच्‍या वडगाव मावळातील साते या जन्‍मगावी करण्‍यात आला. त्‍याचा प्रारंभ शनिवारवाड्यात झाला

ग्रामपंचायतीने वीजदेयक न भरल्‍याने वीजपुरवठा खंडित केल्‍यामुळे किल्ले सदाशिव गडावरील सदाशिव मंदिर अंधारात !

शिवभक्‍तांना अशी मागणी का करावी लागते ? ग्रामपंचायतीने शिवभक्‍तांची अडचण लक्षात घेऊन वीजदेयक लवकरात लवकर भरावे, ही अपेक्षा !

सातारा येथील मंगळवार तळ्‍यातील माशांचा गुदमरून मृत्‍यू !

प्रशासनाने माशांचा मृत्‍यू कशामुळे झाला याचे कारण शोधून त्‍यावर उपाययोजना काढावी आणि संबंधितांवर कारवाई करावी !

सातारा जिल्‍ह्यात अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांची हानी !

अवकाळी पावसामुळे वाई आणि खटाव तालुक्‍यात ३५ ते ४० मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्‍यू झाला असून १० मेंढ्या अत्‍यवस्‍थ आहेत. विविध तालुक्‍यांत शेतात पाणी शिरले आहे. त्‍यामुळे गहू, ज्‍वारी, हरभरा आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठेपणा आणि आमचे यश ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गत २ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. अनेकवेळा ते पक्ष सोडून जातील अशी आवई उठवली गेली; मात्र ते पक्ष सोडून गेले नाहीत, हा त्यांचा मोठपणा आहे आणि आमचे यश आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) येथील श्री कनक कालीश्‍वर मंदिर प्रशासनाने पाडले !

सरकारीभूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी आणि अन्य अतिक्रमणे पाडण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवत का नाही ? हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्यावर दडपशाही करणारे नास्तिकतावादी तमिळनाडू सरकार हिंदुद्वेषीच होत !

श्रीरामजन्मभूमीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

श्रीरामजन्मभूमीविषयीचा निर्णय माझा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी येथे दिले.

आसामध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केलेत, तर उर्वरित मदरशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालू करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर देशातील अन्य भाजपशासित राज्यांतही असे करायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या फोडण्यात आलेल्या मूर्तींची छायाचित्रे ट्विटरवर प्रसारित केल्याने कोलकाता पोलिसांकडून हिंदु वापरकर्त्याला नोटीस !

बांगलादेशचे सरकार नव्हे, तर बंगालमधील कोलकाता पोलीस याविषयी एका हिंदुला नोटीस देतात, हे संतापजनक ! बंगालमधील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत आहे कि बांगलादेशमध्ये ?