सातारा येथील प्रियांका संकपाळ ‘फिंगरप्रिंट’ परीक्षेत देशात प्रथम !

‘फिंगरप्रिंट’ विभागाची मानाची समजली जाणारी ‘अजीज-उल-हक’ ट्रॉफी संकपाळ यांनी २० वर्षांनंतर महाराष्ट्राला मिळवून दिली आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लढा देऊ !’

कालीचरण महाराज यांना अटक करण्यास भाग पाडणारे काँग्रेसी हे धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देणार्‍या अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याविरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकिस्तान सरकारकडून पहिल्यांदाच हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी ‘हिंदु मंदिर व्यवस्थापन समिती’ची स्थापना

अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे !

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

असा निर्णय घेणार्‍या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! हिंदूंची मंदिरे सरकारने नाही, तर भक्तांकडूनच संचालित होणे आवश्यक आहे. जर कर्नाटकमधील भाजपचे सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे !

कोरगज्जा मंदिराची विटंबना करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला अटक

धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

अयोध्या आणि काशी येथे भव्य मंदिर उभारले जात असतांना मथुरा आणि वृंदावन  मागे कसे राहील ? – योगी आदित्यनाथ

काशी येथील काशी विश्‍वनाथाचे मुख्य मंदिर अद्याप मुक्त झालेले नाही आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद उभी आहे. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

काश्मीरमध्ये ६ आतंकवादी ठार

अशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार करूनही काश्मीरधील आतंकवाद संपलेला नाही आणि संपण्याची शक्यता नाही; कारण जोपर्यंत त्यांच्या निर्मात्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत आतंकवादी येतच रहाणार, ही वस्तूस्थिती आहे !

चित्तोडगडावरील ‘लेझर शो’मध्ये राणी पद्मावतीविषयी वादग्रस्त प्रसंग दाखवल्याने भाजपच्या खासदारांनी शो बंद पाडला !

चित्तोडचे भाजपचे खासदार चंद्रप्रकाश जोशी यांनी चित्तोडगडावर नुकताच चालू करण्यात आलेला लेझर शो बंद पाडला. या लेझर शोमध्ये राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्या संदर्भातील प्रसंग दाखवण्यात आला होता.

कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ?