(म्हणे) ‘मोदी शासनाच्या काळात विचार आणि पत्रकार स्वातंत्र्याचा र्‍हास झाला !’ – अधिवक्ता सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार

यावरून ‘हे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आहे कि राजकारण्यांवर टीका करण्यासाठी ?’, असा प्रश्‍न कुणाला पडल्यास त्यात चुकीचे काय ?

(म्हणे) ‘सध्याचा भारत गांधी यांचा नव्हे, तर गोडसे याचा !’ – मेहबूबा मुफ्ती

जे सत्य नाही, अशी विधाने करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न मेहबूबा मुफ्ती करू पहात आहेत. जर हा देश गांधी यांचा नसता, तर भारत पुन्हा अखंड भारत  झाला असता ! तसा तो अद्याप झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.

नेरे (पनवेल) येथे श्री साईबाबा प्राणप्रतिष्‍ठा २० वा वर्धापनदिन सोहळा

या सोहळ्‍यात काकड आरती, अभिषेक, महिमा पारायण, श्री सत्‍यनारायणाची महापूजा, भजन, श्री साई बाबांची पालखी सोहळा, महाआरती, रात्री ८.३० वाजता ह.भ.प. महेश महाराज साळुंखे यांचे सुश्राव्‍य कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.

शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे समुद्रात बुडणार्‍या २ पर्यटकांना वाचवण्यात यश

शिरोडा येथील समुद्रात ४ डिसेंबर या दिवशी बुडणार्‍या मुंबई येथील दोघांना ‘सागर सुरक्षारक्षक’ संजय नार्वेकर आणि ‘राज स्पोर्ट’चे कर्मचारी यांनी वाचवले.

(म्हणे) ‘ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात !’

असे राज्यकर्ते असणार्‍या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे !

वेत्ये येथे गॅसवाहिनी टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या कामामुळे वाहनाला अपघात

विकासकामे करत असतांना ठेकेदार आस्थापनांना काही नियम आणि अटी घातलेल्या असतात कि नाही ? तसेच चालू असलेल्या कामांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते का ? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात.

म्यानमारच्या माजी प्रमुख आंग सांग स्यू की यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

म्यानमारच्या नेत्या तथा नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना एका स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. स्यू की यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच भावना भडकावणे, या गुन्ह्यांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मंदिरात नुकताच धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. त्यामुळे दानपेटीत रोख रक्कम जमा झालेली होती.

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला.

काँग्रेसकडे ९ मतदारसंघांत उमेदवारीसाठी एकच नाव आले, तर फोंड्याचे आमदार रवि नाईक यांना सूचीतून वगळले

फोंडा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉन परेरा यांच्या मते समितीने फोंडा मतदारसंघासाठी राजेश शेट वेरेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.