तमिळनाडूचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्णन् यांचा भाजपमध्ये प्रवेश

ते अध्यात्मविरोधी, राष्ट्रवादविरोधी आणि हिंदीविरोधी आहेत. आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस

गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी नौकेतून ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

‘अल् हुसेनी’ नावाच्या या नौकेमध्ये ६ कर्मचारी सदस्य होते, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात आतंकवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या ही कारवाई केली.

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !

भारतात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट ! – सर्वेक्षणाची माहिती

वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ पशूगणना या कालावधीत भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे.

हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्‍या मुनावर फारुकी याचा कार्यक्रम मुंबईत पार पडला !

हिंदूंनो, हिंदु देवतांचे वारंवार विडंबन करणार्‍यांवर वचक बसवण्यासाठी ईशनिंदा कायदा करणे आवश्यक असल्याचे जाणा आणि त्यासाठी संघटित रूपाने अन् वैध मार्गाने देशव्यापी आंदोलन उभारा !

गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ बोलणार्‍याला फाशी दिली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

भारताच्या फाळणीला, तसेच राष्ट्राविषयीच्या आणि हिंदूंविषयीच्या अन्य अनेक घोडचुकांना उत्तरदायी असणार्‍या म. गांधी यांच्याविषयी लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे !

अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी

‘काशी विश्‍वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकने अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नांविषयी बोलू नये ! – अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई

 अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नांविषयी पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून बोलणे बंद करावे, अशी चेतावणी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे.