समस्या सोडवण्यासाठी प्रथम मध्यस्थतेचा प्रयत्न केला पाहिजे ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

भाग्यनगर (तेलंगाणा) – मध्यस्थतेच्या माध्यमांतून कोणतीही समस्या अल्प वेळेत सोडवली पाहिजे. न्यायालयात जाऊन त्यासाठी चकरा मारण्यास वेळ घालवण्यापासून वाचले पाहिजे. अंतिम क्षणीच न्यायालयाचे साहाय्य घ्यायला हवे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे एका कार्यक्रमाच्या वेळी केले. ‘जेथे शक्य आहे, तेथे महिलांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थता केली पाहिजे’, असेही ते म्हणाले.

सरन्यायाधीश रमणा यांनी पुढे म्हटले की, महाभारताच्या वेळीही मध्यस्थतेचा उल्लेख आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्ण यांनी पांडव आणि कौरव यांच्यामध्ये मध्यस्थतेचा प्रयत्न केला होता. संपत्तीची विभागणी कुटुंबांतील सदस्यांनी सौहार्दपूर्ण पद्धतीने केली पाहिजे.