हिंदु धर्म सोडून गेलेल्यांची ‘घरवापसी’ करणार !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमणकर्ते, तसेच ख्रिस्ती मिशनरी आणि पोर्तुगीज यांच्यामुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी केंद्र सरकारनेच योजना राबवली पाहिजे !

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त अनुमती

महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत चालू करण्याच्या संदर्भात वर्ष २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता; मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यानंतर स्थगिती दिली होती.

काशी आणि अयोध्या यांच्यानंतर आता मथुरेमध्ये भव्य मंदिर बांधणार ! – केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते.

हीच वेळ आहे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची !

नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांना केले आहे

खाद्यपदार्थ कोणत्या घटकांपासून बनवला, याची विस्तृत माहिती न देणार्‍या आस्थापनांवर कारवाई करू ! – देहली उच्च न्यायालय

मुळात सरकारनेच अशा आस्थापनांना त्यांचे खाद्यपदार्थ विक्री करतांना ते शाकाहारी कि मांसाहारी, हे विस्तृतपणे स्पष्ट करण्यास सांगणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांना न्यायालयात जाऊन त्यावर न्यायालयाला आदेश देण्यास लागू नये !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे पुजार्‍याची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

पुजारी काढून देत असलेला सट्ट्याचा क्रमांक जिंकण्यास योग्य न ठरल्याने हत्या : अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पाठवलेल्या यानाचे सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श !

नासाने म्हटले आहे की, इतिहासात प्रथमच अंतराळ यानाने सूर्याच्या प्रभामंडळात (‘कोरोना’मध्ये) प्रवेश केला आहे. प्रवेश केला तो बिंदू सूर्याच्या वातावरणाचा असून तेथे सूर्याचे लोहचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण तीव्र असते.

भिवंडी तालुक्‍यातील संपादक डॉ. किशोर पाटील ‘जीवन गौरव २०२१’ या पुरस्‍काराने सन्‍मानित

नवी देहली येथील केंद्रीय मानवाअधिकार संघटन यांच्‍या वतीने संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांच्‍या हस्‍ते मानवाअधिकार दिवसाचे औचित्‍य साधून त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला.

आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा वापर लोकांना कारागृहात टाकण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही !

‘ईडी’कडून आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा अंदाधुंद वापर या कायद्याच्या महत्त्वावर परिणाम करील. ईडी या कायद्याला दुर्बल करत आहे. जर तुम्ही या कायद्याचा वापर १ सहस्र रुपये, १० रुपये यांच्या गैरव्यवहारामध्ये करू लागाल, तर काय स्थिती होईल ?

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !