गोवा शासन आणि ‘तम्नार’ प्रकल्पाचे अधिकारी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला प्रारंभ

सांगोड, मोले येथे झाडे कापल्याचे प्रकरण पणजी, ७ डिसेंबर (वार्ता.) – सांगोड, मोले येथे झाडे कापल्याच्या प्रकरणी गोवा शासन आणि ‘तम्नार’ प्रकल्पाचे अधिकारी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ७ डिसेंबर या दिवशी सुनावणीला प्रारंभ झाला. ‘गोवा फाऊंडेशन’ या पर्यावरणप्रेमी संघटनेने ही अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ हेक्टर क्षेत्रात १० टक्क्यांहून अधिक … Read more

राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गोवा पोलीस आणि उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार प्रविष्ट

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘प्रिव्हेशन ऑफ इन्सल्टस् टु नॅशनल हॉनर अ‍ॅक्ट १९७१’ आणि ‘एम्.एच्.ए. ऑडर २०१५’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुन्नूर (तमिळनाडू) येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

अशा प्रकारच्या अपघातांमध्ये सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक मृत्यू पावणे, ही सैन्याची मोठी हानी आहे. याकडे गांभीर्याने न पहाणार्‍या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शानकर्त्यांना हे लज्जास्पद आहे !

आमदार रवि नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे फोंडा येथील आमदार रवि नाईक यांनी ७ डिसेंबर या दिवशी सकाळी आमदारकीचे त्यागपत्र देऊन सायंकाळी फोंडा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.

स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथॉलिक चर्च यापूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाचा अभ्यास करणार : दोन शिक्षणतज्ञांकडे दायित्व !  

यातून हे स्पष्ट होते की, चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात मुले, तरुणी आणि महिला यांचे लैंगिक शोषण झाले आणि होत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात असे होत आहे का ? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

दासबोध अध्‍ययन मंडळाच्‍या वतीने मिरज येथे ९ डिसेंबरला दासबोध स्नेहमेळावा !

हा मेळावा समर्थभक्‍त श्री. माधवराव गाडगीळ, श्री. शामराव साखरे, अनुराधाताई मोडक, सौ. ज्‍योति कोरबू यांच्‍या मार्गदर्शनाखाली होणार असून या मेळाव्‍यास श्री. शरदबुवा रामदासी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

भारतात एक टक्का लोकांकडे देशाची २२ टक्के संपत्ती ! – जागतिक विषमता अहवाल

विदेशातील संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या अहवालावर किती विश्‍वास ठेवायचा ?, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे ! यास्तव सरकारने या अहवालातील दाव्याची सत्यता पडताळून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !

(म्हणे) ‘मोगल शासकांनी देशातील अनेक मंदिरांसह कामाख्या मंदिरालाही भूमी दान केली होती !’ – आसाममधील आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा

अशा प्रकारचा खोटा इतिहास सांगून खरा इतिहास खोटा ठरवण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. याला ‘इतिहास (हिस्ट्री) जिहाद’ म्हणायचे का ?

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !