सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विविध निर्बंध
जिल्ह्यात होणार्या आगामी निवडणुका यांच्या कालावधीत जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात १६ डिसेंबर २०२१ पर्यंत विविध निर्बंध लागू केले आहेत.