बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? – खासदार असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रीय अध्यक्ष, एम्.आय्.एम्.

बाबरने ५०० वर्षांपूर्वी श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी बांधली, तसेच मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून तेथे ईदगाह मशीद बांधली, यांसाठी त्यांच्या वंशजांना कोण शिक्षा देणार ? हे ओवैसी सांगतील का ?

४० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली श्री योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटन भारताला परत करणार !

ही मूर्ती ८ व्या शतकातील असल्याचे सांगतिले जात आहे. ‘ही मूर्ती भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे’, अशी माहिती लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली.

अभिनेत्री उर्वशी रौतेला यांनी इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना श्रीमद्भगवद्गीता भेट दिली !

या भेटीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आला आहे.

केरळमध्ये ‘ईडी’कडून पी.एफ्.आय.च्या ४ ठिकाणांवर धाडी

या धाडीतून आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रे आणि विदेशांत असलेल्या संपत्तीविषयीची माहिती मिळाली आहे. देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी ४५ मीटर खोल सरस्वती नदी असल्याचे ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ सर्वेक्षणातून स्पष्ट !

रस्वती नदी १२ सहस्र वर्षांपूर्वी पृथ्वीवरून लुप्त झाल्याचे सांगण्यात येते. हिंदूंच्या धर्मग्रंथांनुसार गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचे उगम स्थान हिमालयात आहे.

पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर खाते काही वेळासाठी ‘हॅक’ !

जर पंतप्रधानांचे खाते ‘हॅक’ होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या खात्यांचे काय ?

‘भगव्या आतंकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने ४०० कोटी रुपये व्यय केले ! – रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार

काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने त्याच्या काळात ‘भगव्या  आंतकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये व्यय करण्यात ओल. पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली; मात्र आरोपींच्या सूचीमध्ये माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत.

‘इस्रो’चा ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाशी करार !

भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्‍या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !

सागर (मध्यप्रदेश) येथील ‘सेंट फ्रांसिस सेवाधाम आश्रमा’त दोघा अल्पवयीन मुलांना बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि बायबल वाचायला लावले !

ख्रिस्त्यांच्या शाळा, महाविद्यालये, अनाथालये आणि आता आश्रम येथे असे प्रकार घडत असतात; मात्र पोलीस अन् प्रशासन त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !