‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक’ सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात ! – नितीन शिंदे, माजी आमदार

या कामाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, सागर शिंदे, प्रथमेश वैद्य, अशोक पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश पवार, दीपक वाघमारे, सुरेश सपकाळ, अंकुश ठोंबरे, राजेश घाडगे उपस्थित होते.

सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत.

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरील घातलेल्या बंदीची कारणे योग्य कि अयोग्य ठरवण्यासाठी लवादाची स्थापना

केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर  या लवादाची स्थापना करण्यात आली आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या दोन वर्षांत केवळ ७ भूखंडच राज्याबाहेरील लोकांनी घेतले विकत !

यातून हेच स्पष्ट होते की, कलम ३७० रहित करूनही आणि प्रतिदिन आतंकवाद्यांना सुरक्षादलांकडून ठार करण्यात येत असूनही ‘काश्मीर अद्याप रहाण्यास सुरक्षित नाही’, अशीच भावना नागरिकांमध्ये असल्याने तेथे कुणी संपत्ती खरेदी करण्यास इच्छुक नाही.

कुन्नूर (तमिळनाडू) येथील हेलिकॉप्टर अपघातात घायाळ झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

त्यांच्यावर बेंगळुरू येथील वायूदलाच्या रुग्णालयात उपचार चालू होते. ते ४५ टक्के भाजले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

चीन नेपाळच्या लुंबिनी शहरापर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग बनवणार !

भारताच्या परराष्ट्रनीतीचा सातत्याने पराभव होत आहे, हेच अशा प्रकारच्या घटनांमधून सिद्ध होते. शेजारी राष्ट्रांना चीन स्वतःच्या मगरमिठीमध्ये घेत असतांना भारताची अधिक आक्रमक होत नाही, हे चिंताजनकच होय !

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

अशा प्रकारची विधाने करणारे नेते असणार्‍या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना लखीमपूर खिरी हिंसाचाराविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी पत्रकाराची कॉलर पकडून केली शिवीगाळ !

ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे, तेच अशा प्रकारचे कायदाद्रोही कृत्य करत असतील, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !