उभादांडा येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना
तालुक्यातील उभादांडा येथील श्री गणेश मंदिरात एक आगळी-वेगळी परंपरा आहे. प्रतिवर्षी या मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही ४ नोव्हेंबरला श्री गणेशाचा जयजयकार करत नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.