देशाच्या विरोधात चालू असलेल्या ‘माहिती युद्धा’ला आपण जिंकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

केरळमधील मार्क्सवादी नेत्यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’द्वारे लव्ह जिहाद केला जाऊन केरळचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे’, असे म्हटले होते. याविषयी कुणीही बोलत नाही. अशा देशविघातक शक्तींना भारतात अराजक माजवायचे आहे. मग ते एन्.आर्.सी.चे (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीचे) आंदोलन असो किंवा आताचे शेतकरी आंदोलन असो. ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा)च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.