पनवेल – दीपावलीनिमित्त येथील राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याचे पूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे साहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आले. या वेळी सह्याद्री ब्लड डोनर्स आणि स्कीमर्स फॅमिली पनवेल रक्तवाहिनी यांनी ९ सहस्रांपेक्षा अधिक लोकांना रक्ताचा विनामूल्य पुरवठा केला आणि ३ सहस्र लोकांना विनामूल्य प्लाझ्मा अन् ६०० हून अधिक लोकांना बेड मिळवून दिले. याविषयी दर्शन म्हात्रे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.