वेंगुर्ले – तालुक्यातील उभादांडा येथील श्री गणेश मंदिरात एक आगळी-वेगळी परंपरा आहे. प्रतिवर्षी या मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही ४ नोव्हेंबरला श्री गणेशाचा जयजयकार करत नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यामुळे येथील परिसर भक्तीमय बनला होता.
४ नोव्हेंबरला मूर्तीची विधीवत् प्रतिष्ठापना आणि पूजा-अर्चा झाल्यानंतर श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. या श्री गणेशमूर्तीचे होळीच्या एक दिवस अगोदर विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर मंदिरात श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते.