कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता.

अफगाणिस्तानशी व्यापार करतांना पाकिस्तानी चलनाचा वापर करणार ! – पाकिस्तान

याचाच अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न पाक करणार, असाच होतो ! पाकचा हा डाव जागतिक समुदाय कधी ओळखणार ?

एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !

फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.

गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील ! –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली.

निधनवार्ता

सनातनच्या साधिका श्रीमती सुप्रिया कदम यांच्या आई श्रीमती सावित्री बाळकृष्ण देसाई यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावी ८ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेची पुनर्रचना !

‘उत्तम इंग्रजीसमवेतच उत्तम मराठी आले पाहिजे’, हा भाषेचा संस्कार मुलांवर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ही संस्था कार्य करेल’, असे कार्याध्यक्ष देशमुख यांनी या वेळी सांगितले.

रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !

पुणे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी !

वारंवार घडणार्‍या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाला नीतीवान बनवण्यासाठी साधना शिकवणेही आवश्यक आहे !

सातारा येथे खासदार आणि आमदार गटामध्ये तुंबळ हाणामारी

८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेन्द्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यात वाद निर्माण होऊन २ गटात तुंबळ हाणामारी झाली.

‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवल्याने होणारी गणेशमूर्तीची विटंबना रोखा !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवल्या जातात. याद्वारे होणारी गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्ह्यात विविध ठिकाणी, तसेच बारामती येथे देण्यात आले.