‘एका कुटुंबात एक उमेदवार’ हे भाजपचे धोरण असेल; परंतु यापूर्वी त्याला काही अपवाद होते ! – देवेंद्र फडणवीस 

भाजपमध्ये मतभेद आहेत;परंतु बंडखोरी नाही ! – देवेंद्र फडणवीस

वेश्याव्यवसायातील बहुतांश मुली आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वेश्याव्यवसायाकडे वळल्या ! – ‘अर्ज’ या संस्थेचा दावा

३७ टक्के महिलांना बळजोरीने या व्यवसायात ढकलल्याचे स्पष्ट

गोव्यात ‘हेली’ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ओल्ड गोवा’ येथे ५ कोटी खर्च करून बांधलेल्या हेलीपॅडचे उद्घाटन

डिसेंबर २०२१ पासून या हेलीपॅडवरून प्रतिदिन हेली सफर आणि संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकाचे संरक्षण करणार्‍या पोलिसांवर गोळीबार !

पाकमध्ये धर्माच्या नावावर लसीकरण मोहिमेला तेथील जिहादी आतंकवादी संघटनांकडून विरोध केला जातो. तेथील सरकारही याविषयी काही करत नाही, हे लक्षात घ्या !

सागरी सीमेच्या वादामुळे बांगलादेशाची भारताच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांत याचिका !

आता छोटा बांगलादेशही भारताला डोळे वटारून दाखवत आहे. यातून भारताने आक्रमक परराष्ट्रनीती राबवणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते !

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ (जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

हिंदुद्वेष्ट्यांचा वैचारिक आतंकवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आयोजकांचे अभिनंदन !

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

हिंदूंना असहिष्णू ठरवून पुरस्कार परत करणारी लेखक, साहित्यिक, पत्रकार आदींची टोळी आता कुठे आहे ? काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्यांविषयी आता समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष कुठे आहेत

कॅप्टन अमरिंदर सिंह यांची अनेक अयोग्य कामे मला ठाऊक आहेत; मात्र मी ती सांगणार नाही ! – पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा

जर कॅप्टर अमरिंदर सिंह यांनी अयोग्य कामे केली आहेत आणि ती मुस्तफा सांगत नसतील, तर मुस्तफा यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ती वदवून घ्यायला हवीत.

सावर्डे ते चांदर रेल्वेमार्ग दुपदरीकरणाची २३ सप्टेंबर या दिवशी होणार चाचणी !

सध्या दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वतीने तिनईघाट ते वास्को रेल्वेस्थानकापर्यंत दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिकांचा रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध असला, तरी रेल्वे प्रशासनाच्या वतीने हे काम चालू ठेवण्यात आले आहे.