सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.ने केलेल्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही ! – चौकशी समितीची माहिती 

मात्र काही कामे अपूर्ण आहेत, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी सूचना संबंधितांना केली, अशी माहिती समितीच्या सदस्यांनी दिली.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उलटूनही नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित ! – पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल

राज्यपालांनी सांगितलेली ही स्थिती आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई होणार !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता गर्दी टाळून ते करण्याचे आवाहन पोलीस करत आहेत; मात्र तरीही काही मंडळे विसर्जन मिरवणूक काढत आहेत. हा प्रकार गंभीर असून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्त्यांनाच अनुमती !

१९ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अनंतचतुर्दशीनिमित्त असणार्‍या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर बंदी आहे. केवळ १० कार्यकर्त्यांनाच विसर्जनात सहभागी होण्यास पोलिसांनी अनुमती दिली आहे.

पुणे येथील गणेश मंडपातील श्रींचे विसर्जन महापालिकेच्या फिरत्या हौदात करण्याचा पोलीस आयुक्तांचा अशास्त्रीय निर्णय !

मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होईल. सर्व मंडळे आपल्या मंडपातील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदातच श्रींचे विसर्जन करणार आहेत. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन !  

गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रांतील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने १७ सप्टेंबर या दिवशी पुण्यात निधन झाले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याच्या अटकेसाठी आलेल्या बंगाल पोलिसांना मारहाण !

चौकशीसाठी बंगाल पोलिसांतील दोघे जण अलीगड येथे आले होते. त्या वेळी वार्ष्णेय यांच्या समर्थकांनी या दोघा पोलिसांना एका खोलीत बंद करून त्यांना मारहाण केली.

मिस्टर इंडिया ‘बॉडी बिल्डर’ मनोज पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न !

‘बॉडी बिल्डर’ मनोज पाटील यांनी गोळ्या घेऊन आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. अभिनेता साहिल खान मागील अनेक दिवसांपासून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या २७ वर्षीय महिलेला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

पुरुषांच्या बरोबरीने आता महिला लैंगिक अत्याचारही करण्यात अग्रेसर आहेत, असे यातून म्हणयाचे का ?